शिरीष घाटे यांची मुखपृष्ठे अवचटांशी नातं सांगतात. इलस्ट्रेशन आणि पेंटिंग यांच्या सीमारेषेवर असणारी चित्रशैली आणि साहित्याची उत्तम जाण ही घाटे यांच्या कामाची वैशिष्ट्ये आहेत

एका वेगळ्या पातळीवर या मुखपृष्ठांमधून गेल्या चाळीस वर्षांमधल्या साहित्यरूपाचा आणि बदलत्या दृक्-संवेदनशीलतेचा, तिच्या वैशिष्ट्यांचा प्रत्यय येऊ शकेल. घाटे यांच्या मुखपृष्ठांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी केलेला अक्षरांचा वापर. त्यात मुद्राक्षरांचा वापर आहे, सुलेखन आहे, अक्षरांचा चिन्हात्मक वापर आहे. एका चित्रकाराच्या मुखपृष्ठांचा संग्रह असा प्रथमच प्रकाशित होत असावा.......